Eternal Flame |
अमेरीकेतल्या सुप्रसिध्द
नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut
Ridge Park) आहे. नायगरा एकदा पाहुन झाला होता त्यामुळे यावेळी वेगळ
काहीतरी बघुया म्हणून शोधाशोध करतांना "इटर्नल फ़्लेम" ची माहिती मिळाली. हा तसा छोटा अप्रसिध्द ट्रेक आहे. अमेरीकेत प्रत्येक
राज्यात अनेक स्टेट पार्क (राखीव जंगल) आहेत आणि त्या राखीव जंगलांमध्ये अनेक आखीव
रेखीव ट्रेल्स असतात. जागोजागी लावलेले दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना , जिथे पायवाट धोकादायक असेल तिथे लावलेले संरक्षक कठडे, लाकडाच्या ओंडक्यांच्या पायर्या हे सगळ पाहिल की आपल्या सारख्या सह्याद्रीत
फिरणार्यांना "पाणीकम" वाटत राहात. पण "इटर्नल फ़्लेम" चा ट्रेक चक्क याला
अपवाद होता.
नुकतेच वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्यामुळे, वेगवेगळ्या रंगाच्या फ़ुलांनी झाड गच्च भरलेली होती. ट्रेकच्या सुरवतीच्या टप्प्यात या झाडांनी स्वागत केल. झाडांवर पान अपवादानेच दिसत होती. अर्थात ही झाड खास इथे आणून लावलेली असावीत अस जंगलात शिरल्यावर लक्षात आले. जंगलात पाईन आणि ओकचे उंचच उंच वॄक्ष होते. त्याच्या दाट सावलीतून वाट जात होती. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पायवाट तीव्र उतारावरुन खाली उतरायला लागली . वॄक्षांची आडव्या पसरलेल्या एकामेकांत गुंतलेल्या मुळांमुळे काही ठिकाणी पायर्यांसारखी रचना तयार झाली होती. या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पायर्यांवरुन मुळांचा आधार घेत उतरल्यावर आम्ही एका ओढ्याच्या काठाने जाणार्या चिंचोळ्या पायवाटेवर पोहोचलो.
ओढ्याच्या काठाने जाणार्या वळणा वळणाच्या सुंदर वाटेने जातांना आजूबाजूच्या झाडीत पक्ष्यांचा किलीबिलाट ऐकायला येत होता. अचानक एका झाडावरुन सुंदर निळा पक्षी उडाला आणि ओढ्या पलिकडच्या झाडावर जाऊन बसला. त्याची (Blue jay) सुंदर छायाचित्र मिळाली. त्यामुळे चाल मंदावली , आजूबाजूच्या झाडीत आवाजांचा वेध घेत पक्षी शोधायला सुरुवात केली. काही पक्षांची छायाचित्र मिळाली तर काहींच फक्त निरिक्षण करण्यातच आनंद मानावा लागला.
Blue Jay |
Sparrow |
Red winged black bird |
Eastern Blue Bird |
Eternal Flame Water fall |
Eternal flame water fall |
नैसर्गिक वायूचे स्त्रोत
कसे तयार होतात ? याबद्दल जिओलॉजीच्या
अभ्यासक्रमात शिकलो होतो,
वारा, पाऊस, उष्णता इत्यादिंचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील
खडकांवर परिणाम होऊन त्याची झीज होते. हा झीज झालेला भाग पाण्या बरोबर वाहून जातो आणि
ज्या ठिकाणी पाणी खोल आणि संथ असते अशा ठिकाणी हा गाळ साचतो. त्याबरोबरच पाण्याबरोबर
वाहून आलेले जैविक घटकही इथे साचत जातात. हा
गाळ कालांतराने कठीण होतो आणि गाळाचे खडक (Sedimentary Rock) तयार होतात. सरोवर, नदीचं पात्र , नद्यांनी निर्माण केलेला
त्रिभूज प्रदेश , समुद्र तळ इत्यादी ठिकाणी हे गाळाचे दगड तयार होतात.
याठिकाणी खनीज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याचे आपण वाचलेले असते.
इटर्नल फ़्लेमचा (Eternal Flame) व्हिडीओ पाहाण्यासाठी प्ले बटणावर टिचकी मारा
पृथ्वीच्या पोटात होणार्या उलथापालथीमुळे हे गाळाचे दगड जमिनीत खोलवर दाबले जातात. या दगडावर पडणार्या दाब आणि उष्णतेमुळे जैविक घटकांचे रुपांतर खनिज तेलात आणि नैसर्गिक वायूत होते. भूगर्भात होणार्या हालचालींमुळे दगडांमध्ये पडलेल्या भेगांमधून नैसर्गिक वायू जमिनीवर येतो. बर्याचदा वीज पडल्यामुळे हा वायू पेट घेतो आणि जमिनीवर ज्योती पेटलेल्या दिसतात. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे भूगर्भातून बाहेर पडणार्या नैसर्गिक वायुमुळे पेटलेल्या ज्योती पाहायला मिळतात. भारतातील हिमाचल प्रदेशात असलेल्या प्रसिध्द ज्वालाजी मंदिरातही अशाच प्रकारे जमिनीतून बाहेर येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे तयार झालेल्या ज्योती दिसतात.
इटर्नल फ़्लेमचा अभ्यास Indiana University Bloomington आणि Italy's
National Institute of Geophysics and Volcanology या दोन संस्थांच्या जिओलॉजिस्टनी
२०१३ साली केला . त्यांना असे आढळुन आले की इटर्नल फ़्लेम मध्ये पाझरणार्या वायूत ईथेन (ethane) आणि प्रोफ़ेन (propane)
वायूचे
प्रमाण 35% आहे. हे प्रमाण जगातील इतर
ज्ञात नैसर्गिक वायूच्या स्त्रोतां पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी मिथेन वायू मोठ्या
प्रमाणात आढळून येतो.
आपल्या इथे धबधब्याच्या खालच्या
भागात डोह असतो. तो नसला तरी आजूबाजूचे खडक पडून धबधब्या पर्यंत जाण्याचा मार्ग दुष्कर
झालेला असतो. पण या ठिकाणी बर्फाच्या लाद्या सरकण्यामुळे गुळगुळीत पॄष्ठभाग तयार झाला
आहे. त्यामुळे ज्योती तेवत असलेल्या गुहेपर्यंत सहज जाता आले. गुहेच्या वरुन पाण्याच्या
धारा पडत होत्या त्या धारांच्या पडद्या आड ज्योती तेवत होत्या. नैसर्गिक वायू जळल्यावर
येणार टिपिकल वास त्या ठिकाणी येत होता. पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नी) , वायू आणि आकाश ही पंचमहाभूत या निबिड
अरण्यात एकाच वेळी पाहायला मिळत होती. आग आणि पाणी हे विरुध्द गुणधर्म असणारी महाभूत या ठिकाणी एकत्र नांदत होती.
या भारावलेल्या
वातावरणात काही वेळ थांबून आलेल्या मार्गाने परत फ़िरलो. एक वेगळा छान ट्रेक झाला. मी
आजवरच्या भटकंतीत पाहीलेल अजून एक सुंदर ठिकाण
म्हणून "इटर्नल फ्लेम" कायम आठवणीत राहील.
जाण्यासाठी :- अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल
पासून ३७ किलोमीटर आणि बफेलो विमानतळापासून १७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क
(Chestnut
Ridge Park) आहे. या
पार्क मध्ये ३ ट्रेक आहेत. त्यातील मध्यम श्रेणीतला हा ट्रेक आहे. जाऊन येऊन साधारणपणे
अंतर ३ किलोमीटर आहे. मे महिना ते ऑक्टोबर हा ट्रेक करता येतो. अमेरीकेत अनेक पार्क्स
मध्ये जाण्यासाठी फी भरावी लागते. पण या ट्रेकसाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5
Amit excellent article and photos. Really it’s admirable that you always search and explore a different world altogether than the routine places which people normally see. Great going. All the best.
ReplyDeleteनवीन प्रदेश आणि प्रवास वर्णण, अतिशय सुंदर. गुढ आनी शास्त्री ये असे दोनी अंग ने वर्णण !
Deleteनेहमी प्रमाणे सुंदर आणि माहितीपूर्ण !
Deleteअतिशय सुंदर वर्णन व फोटोज्. जणू तेथेच आहोत असे वाटले.
DeleteBlue jay we have seen. Nature, u r observation and miracle of flame is wonderful.
DeleteSuperb, खूप छान वर्णन..
Deleteचांगलं लिहिलंय.... बारकाईनं..
ReplyDelete-राजा महाशब्दे
DeleteKhup chan warnan....kahitari weglach pahayala Ani wachayla milala ....
DeleteExcellent Information and well written..Adarsh
ReplyDeleteMast ch,,,,
ReplyDeleteवाह अमित. फारच सुंदर.... Keep it up
ReplyDeleteAmit
ReplyDeleteKhupch chhan
Mule kaka
Excellent details and information! Very nice!
ReplyDeleteWonderful information. I really felt like travelling through!!! 👏👏👏
ReplyDeleteमस्त 👌
ReplyDeleteअमित तू माहिती ब्लॉग रुपात सर्वांसाठी उपलब्ध करून देतो आहेस ही खरोखर एक चांगली गोष्ट आहे. ह्या माहिती आणि ब्लॉग चा अनेकांना नक्की उपयोग होईल
ReplyDeleteमस्त. वेगळी माहिती मिळाली..👌
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली, धन्यवाद अमित
ReplyDeleteInteresting bhau
ReplyDeleteनिसर्गातला अदभुत चमत्कार दाखविल्याबद्दल खूप खूप आभार
ReplyDeleteKhoopach bhari dada. Niagara fall etakech mala hya eternal flame waterfall ch pan aproop vattay! Hope so lavkarach bhet deu.
ReplyDelete~Prajakta
छान वर्णन केले आहे. वर्णन वाचताना आपण प्रत्यक्ष तिथे आहोत असेच वाटते ईतके वर्णन जिवंत वाटते. फोटो असल्याने वातावरणाची कल्पना येते. धन्यवाद सामंत साहेब.
ReplyDeleteहा प्रकार अद्भुतच आहे वर्णनही छान केले आहे मकरंद वैशंपायन
ReplyDeleteबरीच नवीन नवीन माहिती मिळतेय तुझे ब्लॉग्ज वाचून..फोटोही अप्रतिम..मस्त अमित.....
ReplyDeleteवर्णन वाचून त्या ठिकाणी जायची उत्सुकता निर्माण करणारे लेखन. नेहेमी प्रमाणे. 👌🏻🤗
ReplyDeleteAmazing article written ..also photos are stunning
ReplyDeleteसुंदर वर्णन व फोटोची यथार्थ साथ. मस्त
ReplyDeleteBeautiful exploration. Thanks for sharing. Would love to explore Jwalaji temple now.
ReplyDeleteछान माहिती. कधीतरी जायला हवे .
ReplyDeleteखुप सुंदर लेखणी....
ReplyDeleteWonderful pictures and details of the offbeat location. Will definitely try to go there when will travel to the US
ReplyDeleteएकदम भारीच की.... वेगळाच प्रकार बघायला मिळाला...
ReplyDeleteExcellent trek
ReplyDeleteबऱ्याच ठिकाणी भटकंती करून बरीच नावीन्यपूर्ण माहिती गोळा करणे आणि ती अभ्यास पूर्ण मांडणे ही कला छान जोपासली आहे
ReplyDeleteनिसर्गातला हा चमत्कार दाखवल्या बद्दल
धन्यवाद
अमित ...
मस्त...
परक्या मातीतील नैसर्गिक चमत्काराचे वर्णन आपल्याच मातीतील माणसाकडून, ते पण मातीच्या भुगर्भ विश्लेषणासकट, छान!
ReplyDeleteअमित नेहमी प्रमाणे अप्रतीम लेखन, नेहमी प्रमाणे सुरेख वर्णन, नेहमी प्रमाणे निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवण्याची तूझी आवड, नेहमी प्रमाणे माहिती पूर्ण लिहिण वाचताना आवडतंच.
ReplyDeleteभटकंतीची आणि लिहिण्याची तुझ्यात असलेली (internal Spark) ठिणगी
Internal flame 🔥 प्रमाणेच सतत तेवत राहो.....
....श्रीपाद
Khup chan
ReplyDeleteखूपच छान अमितजी आपले ब्लॉग्स मला नेहमीच प्रवासास प्रोत्साहन देतात. 😊
ReplyDeleteअमित,
ReplyDeleteमस्त. अभ्यासपूर्ण आणि रंजक माहिती.
Geology चा अभ्यास चांगला उपयोगी पडत आहे तर .भन्नाट..त्या जागेवर गेल्याचा फिल आला..धन्यवाद.
ReplyDeleteखूप छान माहिती दिलीस
ReplyDeleteMast lihlay amit
ReplyDeleteWow, that's really thrilling experience
ReplyDeleteNice information Amit.Thanks!
ReplyDeleteफ़ारच छान
ReplyDeleteफारच छान
ReplyDeleteडोळ्यांचे पारणे फिटले, अप्रतिम, निसर्गाचे वेगवेगळे रुप पहाणे हा अनुभव तुमच्या मुळे शक्य झाला.
ReplyDeletePratap
ReplyDeleteअमित तूझी लेखणी, प्रवास वर्णन, आणि लेख जिवंत करणारे छायाचित्रे हे सतत लोकांना घरी बसल्या जग फिरण्याचे आनंद देतात.
ReplyDeleteअमेरिकेत ज्वालादेवी चे मंदिर बनवायला हरकत नाही 😂
अमित, नेहमी प्रमाणे उत्तम आणि सविस्तर माहिती. सोबत सुदंर छायाचित्रे यामुळे वाचनीय आहे. परदेशात जाऊन पण तुझा हा स्तुत्य प्रयत्न चालूच असतो याचे कौतुक वाटते. त्यात अमेरिकेत अशी असंख्य नैसर्गिक चमत्कार (चमत्कार म्हणावे का) पहायला मिळतात.
ReplyDeleteनेहमीप्रमाणे मस्त लिखाण... 👌🏼
ReplyDeleteमस्त! एका वेगळ्याच जागेची ओळख करून दिलीत.
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच अचंबित करणारी अभ्यासपूर्ण लेख मालिका अमित..फोटो देखील अप्रतीम...
ReplyDeleteमाहिती पूर्ण आनी सुंदर वर्णन
ReplyDeleteInformative blog, and beautiful pictures. 😍.
ReplyDeleteखूप सुंदर लेख, वाचून जणू आपण प्रवास करत आहोत असे वाटत होते. अमित अश्याच अभ्यास पुर्ण लेखाच्या प्रतिक्षेत
ReplyDeleteGreat …. ! Observations are so minute and describes in so lucid ways! Feels as if Live over there ! Keep going Buddy !
ReplyDeleteसुंदर वर्णन
ReplyDeleteनेहमीप्रमाणे खूप सुंदर ब्लॉक सर खूप छान माहिती दिली🙏😊
ReplyDeleteछान भारीच आहे 👌👌👌
ReplyDeleteअप्रतीम प्रवास वर्णन.एकदम नवीन आणि विशेष माहिती मिळाली. फारच छान. फोटो पण भारी
ReplyDeleteअद्भुत दृश्य, खरंच आणि वर्णन खूपच सुंदर ❤️
ReplyDeleteफारच सुंदर वर्णन केले आहे. त्याला पक्षांचे फोटो, ज्योती चे फोटो व व्हिडिओ ची अप्रतिम जोड आहे. लेख परत परत वाचाण्या सारखा आहे. मी माझ्या इतर मित्रांना पाठविला आहे.
ReplyDeleteउत्तम लिखाण अभ्यासपूर्वक माहिती
ReplyDeleteInformative article and beautiful photos
ReplyDeleteनेहमीप्रमाणे छान वाचनीय, माहितीपूर्ण, फोटोग्राफी छान... फिरता नाही आल तरी तुझा लेख फिरवून आणतो
ReplyDeleteअतिशय अशी सुंदर माहिती व छान फोटोग्राफी...
ReplyDeleteअशीच निसर्गाची व गडांची माहिती आपल्याकडून मिळावी.
वाह एक ठिकाण लिस्ट मध्ये वाढले. सुंदर ब्लॉग
ReplyDeleteमस्तच अमित
ReplyDeleteछान लेख आणि फोटो, नवीन माहिती मिळाली, तू अमेरिकेला गेलेला म्हणजे अस खास काहीतरी वाचायला मिळेल याची खात्री होती.
ReplyDeleteपक्षांचे फोटो अप्रतिम.आवश्यक शास्त्रीय माहिती दिल्यामुळे वाचनिय
ReplyDeleteमी हा लेख पहिलाच वाचत आहे.श्री. रवींद्र पाटील यांनी व्हाट्सअप वर पाठवल्यामुळे मला वाचता आले. प्रवास वर्णना बरोबरच आपण शास्त्रीय माहिती ही दिली आहे हे पाहून खूप बरे वाटले. आपली अशीच वर्णने आम्हाला भरपूर वाचावयास मिळोत. वेगळीच सफर किंवा वेगळा अनुभव आपले सर्व प्रवास वर्णन वाचताना व फोटो पाहताना आला. ज्याप्रमाणे आपण पाचही तत्त्वे एकाच ठिकाणी पाहिली त्याप्रमाणेच आपणातील *लेखक व संशोधक* मला पहावयास मिळाला . पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा. संजय मेथा बेंगलुरु.
ReplyDeleteअमित दादा नेहमी तुझ्या लेखातून स्वतः प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव येतो..अप्रतिम ,अद्भूत .. सर्वच फोटो सुंदर..
ReplyDelete- आरती दुगल
क्या बात है, मजा आ गया. खुप छान आणि माहिती पुर्ण लेख, नेहमीप्रमाणे
ReplyDelete