भीमाच्या पाऊलाचा ठसा |
महाभारत काळात भीमाने बकासुराचा
वध केला ती एकचक्र नगरी म्हणजेच आताचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे गाव असे मानले जाते.
या एरंडोल पासून १० किलोमीटरवर आणि जळगाव
पासून ३१ किलोमीटर अंतरावर पद्मालाय
नावाचे गणपतीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. मंदिराच्या प्रवेश्वदाराजवळ मोठं धान्य दळण्याचे
मोठ जातं आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या तलावात वर्षभर विविध रंगाची कमळ फुललेली
असतात म्हणून हे पद्मालंय. या पुरातन मंदिरात उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणपतीच्या
मूर्ती एकाच गर्भगृहात आहेत. याला अर्धपीठ म्हटले जाते. मंदिरात पितळेची मोठी घंटा
आहे.
पद्मालय |
मंदिराच्या मागाच्या बाजूस
मंदिरापासुन १.५ किलोमीटर अंतरावर एका ओढ्यात भीमकुंड आहे. दाट जंगलाची पार्श्वभूमी असलेल्या
एका ओढ्यात (भीमच्या) पायाच्या आकाराचे कुंड आहे. भीमकुंडा पर्यंत जाण्यासाठी पायऱ्या
आणि शेवटच्या टप्प्यात पाऊलवाट आहे. भीमाने बकासुरचा वध याच परिसरात केला होता असे
मानले जाते.
भीम कुंड |
त्याचा पुरावा म्हणून ओढ्यात
असलेला भीमच्या पायाचा ठसा (त्यामुळे तयार झालेले भीम कुंड ) दाखवतात, तसेच कातळात
असणारे "तांदूळ" दाखवतात. महाभारतातल्या कथेनुसार एकचक्र (एरंडोल ) गावाच्या
रहिवाश्यां ऐवजी अन्नाने भरलेला गाडा घेऊन भीम बकासुराला भेटायला गेला. त्यानंतर त्यांच्यात
झालेल्या युद्धात गाडा उलटला आणि गाड्यातले तांदूळ विखूरले. ते तांदुळ आजही कातळावर
दिसतात असे इथले लोक मानतात. भीमकुंडाकडे जातंना पायर्या संपल्यावर पाऊलवाट चालू होते
तेथून भीमकुंडापर्यंत हे स्फटीक असलेले दगड पाहायला मिळतात.
"मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" |
विखुरलेले तांदूळ (Mega porphyry Besalt) |
या ठिकाणी "मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" ( Mega porphyry Besalt) आहे. महाराष्ट्रात बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर लाव्हारस जमिनीच्या पोटातून बाहेर येऊन जमिनीवर पसरतो. त्या पासून बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. हा लाव्हारस हवेच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येऊन लवकर थंड झाल्यास त्यातील खनिजांचे स्फटीक बनण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बेसॉल्ट खडकामध्ये स्फटीक असले तरी ते मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात. आपल्या डोळ्यांना मात्र काळा कातळच दिसतो.
लाव्हारस जमिनीतून बाहेर आल्यावर, त्यावर अजून
एखादा लाव्हारसाचा थर जमा झाला तर, खालचा लाव्हारस हळूहळू थंड
होतो. त्यामुळे खनिजांचे स्फटीक बनण्यास पुरेसा
वेळ मिळतो आणि ३ ते ४ सेंटीमीटर लांब आणि साधारणपणे १ सेंटीमीटर रुंद असे आयताकृती
खनिजांचे स्फटीक तयार होतात. अशा प्रकारच्या दगडाला "मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट"
असे म्हटले जाते. कालांतराने हा दगड भूपृष्ठावर आल्यावर त्या दगडात पांढर्या रंगाचे
स्फटीकांचे तुकडे दिसायला लागतात.
Bheem Kund |
भीमकुंड परिसरात दिसणारे विखुरलेले
तांदुळ म्हणजेच हा "मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट" आहे. कुठल्यातरी काळातल्या
चतूर माणसाने हा दगड पाहून याला महाभारतातल्या भीम - बकासूर युध्दाची कथा चिकटवली आणि
या दंतकथेचा जन्म झाला.
या प्रकारचा मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" ( Mega porphyry Besalt) खडक पुरंदर
किल्ल्यावर वरच्या टप्प्यातही आढळतो. तसेच महाराष्ट्रात बरेच ठिकाणी पाहायला मिळतो.
मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट |
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऎनारी गुहा (बकासूर वाडा) येथेही भीम आणि बकासुराचे युध्द झाले असे मानले जाते .
विशेष आभार :- बोरकर सर आणि
अभिजीत घोरपडे सर
" महाभारतातील विराट नगर " हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
" सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी " हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
अतिशय छान लेख👍
ReplyDeleteSunder lekh
ReplyDeleteGood research
ReplyDeleteमस्त...लेख.....दादा
ReplyDeleteमस्त लेख,मी ह्या ठिकाणी गेलो आहे
ReplyDeleteInformative article
ReplyDeleteमाहितीपूर्ण छान लेख.....
ReplyDeleteBeautiful location and nice piece of information. I like such ancient temples more than the crowded ones.
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteछान माहिती छान लेख.....
ReplyDeleteमाहितीवर्धक लेख 👌🏽
ReplyDeleteनेहमी प्रमाणे सुंदर लेख 👌👌👌
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteनेहमीप्रमाणे छान ओघवत लिखाण आणि आमचा माहितीपूर्ण प्रवास धन्यवाद --सुधीर कोकाटे
ReplyDeleteWould like more of such unexplored places
ReplyDeleteखुप छान माहीती.......
ReplyDeleteअनवट भ्रमंतीवर्णनाला शास्त्रीय माहितीची जोड! स्थळाला संलग्न दंतकथा आणि त्यामागची शास्त्रीय उकल असा खजिना फक्त डोंगरभाऊंच्या ब्लाॅगमध्येच पहायला मिळतो. नविन ब्लाॅगच्या प्रतिक्षेत...
ReplyDeleteमस्त लिहिलंय 💐
ReplyDeleteचांगली माहिती....लिखाण उत्तम ..👍🏻
ReplyDelete...मनोहर देवधर
छान लिहीलय 👍
ReplyDeleteशास्त्रीय कारण लोकांपर्यंत पोहोचवण्याच चांगलेच काम करीत आहात ...
कधी आम्हास पण संधी द्या ... 🤪
माहितीपूर्ण लेख, अशा माहितीपूर्ण लेखातून महाराष्ट्राची महती कळते, छान
ReplyDeleteखूप सुंदर लेख...
ReplyDeleteनेहमीप्रमाणे सुंदर लेख. महाभारत आणि रामायण यातील अनेक दंतकथा भारतभर पसरलेल्या आहेत. त्यातलीच ही एक असावी.
ReplyDeleteसुंदर माहिती!! खूप छान लिहिलंय !!
ReplyDeleteसुंदर माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteदादा मस्त भटकंती , महाभारतातील कथा व भूगर्भशास्त्रीय उकल यांची सुंदर मांडणी 👍
ReplyDeleteनेहमी प्रमाणे अतिशय सुंदर आणि मुद्देसूद मांडणी, मित्रा तू असाच लिहित रहा आणि मी वाचत राहतो
ReplyDeleteसुंदर लेख. सुंदर म्हटले आहे, कारण डोंगरभाऊ जे लेख लिहितात ते मी वाचत नसून चक्क पाहत असतो. त्यामुळेच मला ते सुंदर दिसतात.
ReplyDeleteबाकी नेहमीप्रमाणे कोणाच्याही श्रद्धेला धक्का न देता एका इंजिनियरने केलेले विश्लेषण आणि स्थानमहात्म्य वर्णन सुंदर.
धन्यवाद डोंगरभाऊ.
ऐतिहासिक कथेला अभ्यासपूर्ण जोड. छान माहिती
ReplyDeleteखरोखर फार सुंदर असा माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteधन्यवाद डोंगर भाऊ
Excellent
ReplyDeleteExcellent combination of science and mythology
ReplyDeleteखूप सुंदर अमित छान लेख
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteपुराण आणि सायन्स ह्याची सुंदर सांगड तसेच सुंदर वर्णन नेहमी प्रमाणे.
ReplyDeleteखूप छान अमित माहिती आहे ही
ReplyDeleteDada, Excellent explanation of Geology, Nature with photos. Before moving to any trek we family read your blogs & treksathi website instructions. Excellent !
ReplyDeleteपुराणातील कथा आणि शास्त्रीय अभ्यास, भूशास्त्रीय उकल यांनी सांगड सुंदर अभ्यासपूर्ण माहिती
ReplyDeleteखूप छान व माहितीपूर्ण लेख तसेच सोबत असलेल्या फोटोमुळे प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव आला.
ReplyDeleteधन्यवाद डोंगरभाऊ.
दंतकथेला सबळ शास्त्राधार दिल्याबद्दल आभार.....
ReplyDeleteInformative article
ReplyDeleteInformative article. Very nice
ReplyDeleteखुपच छान आणि माहितीपूर्ण लेख अमित...
ReplyDeleteतुझे लेख नेहमीच उत्तम माहिती आणि सर्वसामान्यांना कळेल असे लेखन, रंजक माहिती आणि इतिहास यांचे उत्तम सांगड घातलेले असतात त्यामुळे मी नेहमीच वाचतो खूप मस्त अमित
ReplyDeleteAs usual, very nice and informative article
ReplyDeleteनेहमीप्रमाणे उत्तम माहितीपूर्ण लेख, शास्त्रोक्त माहिती द्वारे तांदुळाच्या कथेची मांडणी केली हे उत्तमच, तीच गत तिथल्या भीमाच्या भल्या मोठ्या पावलाचीही असावी असं वाटतं 😊
ReplyDeleteखुपच छान, नवीन माहिती.उत्तम लेख.
ReplyDeleteखूप च informative
ReplyDeleteBest written as always
ReplyDeleteAs usual , detailed information 😊
ReplyDeleteसाहेब, खुप सुंदर लेख . शास्त्रीय, ऐतिहासिक, माहितीपूर्ण लिखाण. सुंदर छायाचित्रण
ReplyDeleteखूप छान माहिती , धन्यवाद🙏
ReplyDeleteExcellent !!
ReplyDelete👌 Very nice information
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख, त्याच बरोबर खडकाची निर्मिती व दगडात तांदूळ दिसतात त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण मस्तच!!!!!!
ReplyDeleteलक्ष वेधी माहिती,पद्मलयाच्या अनुषंगाने आलेली बकासुर वधाची कथा जरी बाजूला केली तरी या जागेचे नैसर्गिक महत्त्व कमी होत नाही.
ReplyDeleteपॉरफेरीटिक दगडा बद्दलची माहिती छानच
उत्तम लेख
अप्रतिम
ReplyDeleteVery informative article
ReplyDelete