|
Giraffe |
जिराफ हा सध्याच्या जगात वेगळ्याच ग्रहावरुन आलेला प्राणी भासतो. त्याची लांब मान, उंची यामुळे हा प्राणी सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. कातडी आणि अंधश्रद्धा यामुळे या प्राण्यांची शिकार होते. नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्याची पत्नी बेट्टीज यांनी मिळून १९७९ मध्ये AFEW अफ्रीकन फंड फॉर इंडेजर्ड वाईल्ड लाईफ ही संस्था स्थापन करुन Rothschild's giraffe जिराफ या संकटात असलेल्या जातीच्या संवर्धनाची सुरुवात केली. त्यावेळी फक्त १२० Rothschild's giraffe जिराफ उरले होते. जॉक आणि बेट्टीने ५ वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी त्यांचे संवर्धन आणि संरक्षण केले . त्यामुळे या जिराफांची संख्या वाढून आज १५०० झालेली आहे.
|
Giraffe at Masai Mara |
नर जिराफ़ांची उंची साधारणपणे १८ फ़ूट (यात ६ ते ७ फ़ूट लांब मानच असते) तर मादी जिराफ़ांची उंची १४ फ़ूट असते. जिराफ़ांचे वजन ७०० ते १३०० किलोग्रॅम असते. अशा उंच आणि वजनदार प्राण्याच्या शरीराला रक्त पुरवठा करणारे ह्र्दय २ फ़ूट लांब आणि ११ किलोग्रॅम वजनाचे असते. जिराफ़ांच्या फ़ुफ़्फ़ुसांची क्षमता १२ गॅलन म्हणजेच ५५ लिटर असते. (माणसाच्या फ़ुफ़्फ़ुसांची क्षमता १.५९ गॅलन म्हणजेच ६ लिटर असते. एवढ्या अवाढव्य शरीराचा भार पेलणारी पावले फ़ूटभर लांबीची असतात. जिराफ़ाला दोन शिंग असतात. ती मांसल त्वचेने झाकलेली असतात. एवढा अवाढव्य प्राणी शाकाहारी आहे. झाडाझुडूपांची पान, गवत तोडून आपल्या २१ इंच लांब जीभेने तो अन्न पोटात ढकलतो. या अन्नातून मिळणार्या पाण्यामुळे तो आठवडाभर पाण्या शिवाय राहू शकतो. एका कळपात साधारणपणे १० ते २० जिराफ़ असतात. त्यांचा प्रदेश ठरलेला नसतो. चरत चरत ते पुढे जात राहातात. जिराफ़ाची मादी एकावेळी एकाच पिल्लाला जन्म देते. जन्म देतांना जिराफ़ाची मादी उभी असल्याने साधारणपणे पाच फ़ूटावरुन जिराफ़ाचे नवजात पिल्लू खाली पडते. पण थोड्याच वेळात ते उठून उभे राहाते आणि कळपाबरोबर चालायला लागते. जिराफ़ त्यांच्या शत्रूशी मारामारी करण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब पळणे पसंत करतात. जिराफ़ साधारणपणे ६० किलोमीटर/ तास वेगाने धावू शकते. जिराफ़ाची अचूक लाथ सिंहासारख्या प्राण्याला यमसदनाला पाठवू शकते.
|
Rothschild's giraffe |
जिराफांचे केवळ संरक्षण आणि संवर्धन करुन ते थांबले नाहीत तर जिराफा बद्दल केनियातील आणि जगभरातील मुलांना आणि मोठ्या माणसाना माहिती व्हावी. त्यांना जवळून पाहाण्याची , खाऊ घालण्याची संधी मिळावी या करीता त्यांनी त्यांच्या लॅगाटा मधील जागेत जिराफ सेंटरची स्थापना केली. दररोज सकाळी ९ वाजता जिराफ सेंटर उघडते. खास तयार केलेल्या लाकडी डेकवर आपल्याला नेले जाते. वाटेत बादल्या मधून जिराफाना खाण्यासाठी खास बनवलेल्या बोटाच्या आकाराच्या काड्या ठेवलेल्या असतात. त्या काड्या घेऊन त्या लाकडी डेकच्या गॅलरीत उभे राहील्यावर जंगलातून जिराफ येतात. मग आपल्या हातातील काड्या आपण जिराफाना भरवू शकतो. जिराफ़ांना भरवतांना काही काड्या खाली पडतात. त्या खाण्यासाठी तेथे रानटी डुककर (Warthog) आहेत. Warthog ना पाहीले की Lion King या प्रसिध्द Animation पटातील "हकुना मटाटा" हे प्रसिध्द गाण आठवते. "हकुना मटाटा" या स्वाहिली भाषेतील म्हणीचा अर्थ आहे. "No Problem, No worries". रानटी डुककर (Warthog) हे नेहमी इतर कुठल्या तरी प्राण्यांच्या कळपा बरोबर आढळ्तात. याचे कारण म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. या रानडुकराचा मेंदू इतका लहान असतो की त्याला ३० सेकंदानंतर आपण आधी काय आणि कशासाठी करत होतो तेच आठवत नाही. म्हणजे समजा हे रानडुक्कर आपल्या मागे लागले आणि आपण सलग तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ पळालो तर, नंतर रानडुकराला आठवत नाही आपण का धावतोय आणि ते त्याच्या नॅचरल इंस्टींगने ते अन्न शोधायला लागते. एखादा शिकारी प्राणी मागे लागल्यावर सुध्दा असे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे रानडुक्कर इतर प्राण्यांच्या कळपा बरोबर राहातात. शिकार्याने पाठलाग केल्यावर सर्व कळप पळत सुटतो आणि त्याबरोबर रानडुक्कर धावत राहातात आणि त्यांचे प्राण वाचतात.
|
रानटी डुककर (Warthog) |
|
Warthog & Rothschild's giraffe at Giraffe Center |
आम्ही उभे होतो त्या ठिकाणी "सलमा" नावाची सात वर्षाची जिराफ आली. आपल्या लांब जीभेने ती आमच्या हातातल्या काड्या ओढून पोटात ढकलायला लागली. इतर तृणभक्षक प्राण्यांप्रमाणे जिराफही आधी पटापट खाऊन घेतो आणि नंतर रवंथ करतो. जिराफा सारखा उंच आणि मोठा प्राण्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हालचाल पाहाण्याची संधी जिराफ सेंटरमुळे मिळाली. काही लोकांनी त्या काड्या आपल्या तोंडात धरुन जिराफाना भरवल्या त्याला " जिराफ किस" म्हणतात. जिराफाला भरवताना खाली पडलेल्या काड्या खाण्यासाठी तिथे रानडुक्करे जमलेली होती. खाली पडलेल्या काड्या त्या पटापट संपवत होती.
|
Giraffe Feeding at Giraffe Center Nairobi |
|
Giraffe Kiss at Giraffe Center Nairobi |
गॅलरीच्या आतल्या बाजूला जिराफ इंफॉर्मेशन सेंटर होते. या ठिकाणी जिराफा बद्दल इत्थंभूत माहिती मिळाली. अफ्रिका खंडात जिराफांचे ३ प्रकार आहेत. मसाई जिराफ, Rothschild जिराफ आणि रेटीक्युलेटेड जिराफ. यातील मसाई जिराफ आणि Rothschild जिराफ हे केनियाच्या दक्षिण भागात सापडतात. तर रेटीक्युलेटेड जिराफ वाळवंटी प्रदेशात आढळतात. त्यांच्या अंगावरच्या खुणांवरुन (पॅटर्न) वरुन त्यांना वेगवेगळे ओळखता येते. मसाई जिराफाच्या अंगावर चांदणी सारख्या आकाराच्या खुणा असतात तर इतर दोन प्रकारच्या जिराफांच्या अंगावर चौकोनी खुणा असतात. त्यातही Rothschild जिराफाच्या अंगावर ब्लड स्पॉट्स असतात. त्यामुळे ते वेगळे ओळखता येतात.
|
Giraffe leg bone ( Real fear for predators) |
|
Worthog's skull |
|
Giraffe's jaw |
|
Giraffe Information at Giraffe Center |
जिराफाच्या लांबलचक मानेत फक्त सात हाडे (मणके) असतात. त्यावर या लांबलचक मानेचा डोलारा उभा असतो. मानेपासून शेपटीपर्यंत एकूण पन्नास हाडे असतात. ही हाडे जिराफांच्या वेगवेगळ्या जातीत थोडी कमीजास्त असतात. जिराफाच्या पायाचे हाड तिथे ठेवलेले होते. या मजबूत आणि जड हाडाच्या धसका त्याच्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्यांनी घेतलेला असतो. कारण जिराफाची एक अचूक लाथ त्या प्राण्याला कायमची जायबंदी करु शकते.
|
Souvenir Shop, Giraffe Center |
जिराफ हा शांत प्राणी आहे. कळपातील श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी नरामध्ये जी मारामारी होते त्यात ते एकमेकांच्या मानेला विळखा घालून डोक्याने टक्कर देतात आणि यात हरलेला नर माघार घेतो. अशा शांत प्राण्याचीही कातडीसाठी शिकार केली जाते . काही आदिवासी जमातीत जिराफांची शिकार केल्यास स्वर्ग प्राप्त होतो अशी अंधश्रद्धा आहे . त्यामुळे आजच्या काळात अशा प्रकारच्या जिराफ सेंटरची आवश्यकता आहे. मसाई माराला हल्ली बरेच पर्यटक भारतातून जातात. त्यांना एक दिवस नैरोबीत मुक्काम करावा लागतो. त्यांनी जिराफ सेंटर आणि एलिफंट ऑर्फनेज सेंटर ही दोन्ही ठिकाणे आवर्जून पाहावीत. जिराफ़ सेंटर ठिक ९.०० वाजता उघडते आणि संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत पर्यटकंसाठी खुले असते. एलिफंट ऑर्फनेज सेंटर मात्र फ़क्त ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत उघडे असते. त्यामुळे सकाळी लवकर जिराफ़ सेंटर पाहून एलिफंट ऑर्फनेज सेंटर पाहायला जावे.
|
Giraffe at Masai Mara |
Elephant Orphanage Center , Nairobi यावर " हत्तींचे अनाथालय" हा लेख लिहीलेला आहे .
सुंदर माहीती,अमित तु प्रवास करताना डायरी मेन्टेन करत असावा,😂नाहीतर ऐवढी माहीती पोटात ठेवणे 😎
ReplyDeleteनाही रे डायरी ठेवत नाही आणि लिहीतही नाही.
Deleteअप्रतिम✍
ReplyDeleteछान👏
सुंदर 👌
Good..faarach chaan lekh..!!
ReplyDeleteमस्तच माहिती आहे
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteछान माहिती मिळाली, कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteGreat information n interesting also for tourists great job
ReplyDeleteखुपच सुंदर माहिती दिली आहेस... पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती..
ReplyDeleteखुपच सुंदर माहिती दिली आहेस. पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त.
ReplyDeleteअप्रतिम अमित दादा, तुम्ही खूप छान प्रवास वर्णन लिहिता. सोबत उत्कृष्ट फोटोग्राफी आणि छान माहितीही. त्यासाठी तुम्ही नक्कीच खूप मेहनत घेत असणार कारण तेथील माहिती मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागली असेल आणि नंतर ती शब्दात उतरवणे.
ReplyDeleteExcellent information and narration, other than kenya which are the other countries where giraffe's live in their natural habitat
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख!
ReplyDeleteप्रत्यक्षात तिथे असल्याचा अनुभव येतो. समर्पक छायाचित्रांनी अजून रंगत आली आहे.
संधी मिळाली तर निश्चितच जाऊन येईल👍
नेहमीप्रमाणे उत्तम आणि माहितीपूर्ण लेख 👌👍
ReplyDeleteKeep it up..👍
Good work. Hakuna Matata
ReplyDeleteखुप छान माहितपूर्ण लेख👍
ReplyDeleteखूपच छान माहिती आहे
ReplyDeleteअप्रतिम,सुंदर वर्णन,फारच छान माहिती मीळाली,धन्यवाद.💐💐👍👍💐
ReplyDeleteदादा, मस्त...बरीच नवीन माहिती समजली...जायलाच हवं केनियला...👌👌
ReplyDelete