पक्षी निरीक्षणाचा छंद नकळत अनेक आनंदाचे क्षण देउन जातो. नाशिक जवळ असलेल्या नांदुर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात. भारतात 1301 पक्ष्यांच्या जाती आढळतात, तर महाराष्ट्रात पक्ष्यांच्या 640 प्रजाती आढळतात. त्यापैकी 240 प्रजाती नांदुर मधमेश्वर मधे आढळतात. यात अनेक स्थानिक , स्थलांतरीत आणि दुर्मिळ पक्षीही आढळतात. डिसेंबर ते मार्च हा स्थलांतरीत पक्षांच्या सीजन असल्याने आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीत नांदुर मधमेश्वरला दाखल झालो.
नांदुरला अनेक ट्रेल आहेत. पाण्यावर धुक्याची चादर असल्यामुळे त्यातील शेतातला ट्रेल प्रथम केला. असंख्य पाकोळ्या (Swift) आणि इतर नेहमी आढळणारे पक्षी दिसले.
सूर्यनारायणाच्या कृपेने धुक्याची चादर विरायला सुरुवात झाली, तसे आम्ही पाणपक्षी पाहाण्यासाठी वनखात्याने उभारेल्या मनोर्यापाशी पोहोचलो. धरणातून पाणी न सोडल्यामुळे पाण पक्षी खुप लांबवर दिसत होते. दुर्बिणीतून बघण्यात आनंद मानत होतो. कॅमेर्याला विश्रांतीच होती. तिथे काही स्थानिक तरुण होते. त्यानी आम्हाला त्या पक्ष्यांच्या जवळ नेतो म्हणजे तुम्हाला चांगली फोटोग्राफी करता येइल अस अमिष दाखवल. मी आणि माझा मित्र अमेय त्यांच्या मागुन निघालो. पाण्याच्या कडेने 6 फुट उंच पाणकणसाच गवत फोफावल होत. त्यात water morning glory , बेशरम इत्यादी पाणथळ जागी उगवणार्या वनस्पती फोफावल्या होत्या.
आमच्या वाटाड्याच्या मागोमाग दलदलीत शिरलो. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव होता. दलदल संपल्यावर पाण्यात बुडलेल्या पाणकणासावर पाय दिला पहिल्याच पाउल मांडीपर्यंत खाली गेल. बर्फगार थंडपाणी होत. सर्व अंग क्षणभर बधीर झाल. इथुनच मागे फिराव अस वाटत होत. तो पर्यंत दुसर पाउल पाण्यात टाकल होत. गवतावरुन काही ठिकाणी घोट्याभर तर काही ठिकाणी पाउलभर पाण्यातून प्रवास करत बर्यापैकी आत शिरलो. आता मोक्याची म्हणजे 'नीट उभ राहाता येइल अशा जागी उभ राहुन फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षण चालु केल.
इतक्यात आमच्या डाव्या बाजुच्या गवतात खसफस ऐकु आली. थोड्याच वेळात त्यातुन एक तपकीरी रंगाचा पक्षी बाहेर आला . आपल्या लांबुडक्या पायावर कधी पाण्यात तर कधी गवतावर चालत तो आपल खाद्य टिपत होता. आम्ही दगडासारखे निश्चल राहुन त्याच्या हालचाली नजरेने आणि कॅमेर्याने टिपत होतो. चांगली 15 -20 मिनिटे दर्शन देउन तो पक्षी गवतात लुप्त झाला. आमच्या बरोबर आलेल्या वाटाड्याला या पक्ष्याबद्दल माहिती नव्हती. मघाशी आम्ही गवतात शिरतोय ते बघुन एक तरुण आमच्या मागोमाग आला तो नांदुर मधमेश्वर वर पी.एच.डी करत होता पण त्यालाही तो पक्षी ओळखता आला नाही. यामुळे आमची ही उत्सुकता ताणली गेली. पाण्यातुन बाहेर आल्यावर जवळ असलेली तमाम पुस्तक चाळली.
आम्हाला थोडा वेळ दर्शन देऊन गेलेला Baillon's Crake (Porzana pusilla) " बिलियनची फ़टाकडी" हा स्थलांतरीत पक्षी आहे. फ़्रेंच निसर्ग तज्ञ Louis Antonie Francois Baillon याच नाव या पक्ष्याला देण्यात आल आहे..१६ ते १८ सेमी लांब असलेला या पक्ष्याची चोच छोटी पण टोकदार असते. मुख्यता किटक आणि इतर जलचर खाण्यासाठी त्याला या चोचीचा उपयोग होतो. गवता वरुन उथळ पाण्यातून चालताना हा पक्षी थोड्या थोड्या वेळाने आपली चोच पाण्यात, गवतात, चिखलात खुपसून अन्न टिपताना दिसतो. या पक्ष्याचे पंख व वरचा भाग तपकीरी रंगाचा असतो त्यावर लाटांसारखे पांढरे पट्टे असतात. गळ्याचा आणि पोटाचा भाग हिरवट राखाडी रंगाचा असतो. विणीच्या हंगामात हा पक्षी पाणथळ जागे जवळील उंच गवतात तिथल्याच गवतात काड्या वापरून घरट बनवतो. त्यात ४ ते ६ अंडी घालतो. नर आणि मादी दोघेही या काळात अंड्यांवर बसतात. मुळात लाजरा असणारा हा पक्षी याकाळात हा फ़ारसा नजरेस पडत नाही केवळ त्याच्या आवाजा वरून त्याच अस्तित्व जाणवत.
सुंदर माहिती
ReplyDeleteछान माहिती..
ReplyDeleteछान माहिती मिळाली,,, नांदूर मधमेश्वर इतर पक्ष्यां बद्दल अधिक माहिती द्याल का?
ReplyDelete