उंबरदरा |
अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर हे घाटमाथ्यावरचे प्राचीन गाव. सध्याच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या अलंग - मदन - कुलंग या दुर्ग त्रिकुटापैकी अलंगच्या कुशीत वसलेले मुळ गाव धरणामुळे आता विस्थापित झालेले आहे. पूर्वीच्या काळी व्यापार्यांचे तांडे सह्याद्रीची डोंगररांग पार करुन घाटघर गावात विश्रांतीसाठी थांबत असत. त्यासाठी प्राचीन काळापासून आजपर्यंत चोंढ्या घाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), घाटनदेवी घाट (पायथ्याचे गाव :- मेट), निसणीची वाट, नळीची वाट (पायथ्याचे गाव :- चोंढ्या), ऊंबरदरा (पायथ्याचे गाव :- चोंढ्या) या चार घाटवाटा अस्तित्वात आहेत.
चोंढ्या घाट |
भातखळा |
पायऱ्या संपल्यानंतर आम्ही एका मोठ्या वीजेच्या टॉवर खाली आलो. धरणाच्या पाण्यावर तयार झालेली वीज ग्रीडशी जोडण्यासाठी हे टॉवर्स उभारलेले आहेत. टॉवरच्या पुढे पायवाट एका मोकळ्या पठारावर आली. समोरुन घाटवाट उतरुन एक गावकरी येत होता. त्याच्याकडून ही वाट बरोबर असल्याची खात्री केली. गावकरी या वाटेने तासभरात घाटघरला पोहोचतात असे त्याने सांगितले. आम्ही उभे होतो. त्या पठाराला "भातखळा" म्हणतात असेही त्याने सांगितले . अशा घाटवाटांवर गावकऱ्यांचे नेहमीचे विश्रांतीचे टप्पे असतात आणि त्यांना स्थानिक नावही असतात. जिथे दम खाण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी बऱ्याचदा एखादा डेरेदार वृक्ष आणि बसण्याजोगा एखादा खडक तरी नक्कीच असतो. चोंढ्या धरणाच्या जागी गाव असताना या भागात भात शेती केली जात होती म्हणून हा "भाताचा खळा" . याचा पुढचा स्टॉप "आंब्याचा मोढा" आणि त्यानंतरचा "म्हसोबा" हेही त्याच्याकडून कळले. तिथे फोनची रेंज होती. त्यामुळे घाटघर मधल्या एकनाथला फोन केला . दुपारचे जेवण त्याच्याकडे सांगितले होते आणि उंबरदर्याच्या वाटेने तोच आम्हाला खाली घेउन येणार होता. एकनाथ म्हसोबा जवळ भेटतो बोलला .
शिपनुर-आजोबा-चोंढ्या धरण |
म्हसोबा |
एकनाथने म्हसोबासमोर अगरबत्ती लावली. म्हसोबा पासून तीन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट घाटघर गावात जात होती. उजवीकडे जाणारी वाट कोकणकड्याकडे जात होती आणि डावीकडे जाणारी वाट म्हसोबाच्या बाजूने पाण्याकडे जात होती. डावीकडच्या वाटेने थोडे उतरुन गेल्यावर समोर डोंगराचा कातळकडा उभा ठाकला होता. याठिकाणी कातळात चर खोदून एक छोटासा खड्डा बनवलेला होता. कातळातून झिरपणारे पाणी चरातून या खड्ड्यात जमा होईल अशी योजना होती. पण जानेवारीतही याठिकाणी पाणी नव्हते, पण ठिकाण सुंदर होते.
पुन्हा म्हसोबापाशी येऊन उजवीकडील प्रशस्त वाट पकडली या वाटेवर कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. आता धरणात बुडालेल्या मुळ घाटघर गावाकडे जाणारी ही प्राचीन वाट होती. यावाटेने पाच मिनिटे चढून गेल्यावर पठारावर पोहोचलो. याठिकाणी पाण्याची दोन टाकी आहेत. एक कड्या लगत आहे. दुसरे त्याच्या थोडे वऱच्या बाजूला आहे. याठिकाणाहून मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत होता. पाठीवरच्या सॅक उतरवून सर्वजण समोरचा नजारा पाहात बसलो. कड्यावर काही गावकरी बायका आणि पुरुषही विखरुन बसले होते. त्यांनाही भर उन्हात हा नजारा बघत बसलेले बघून आश्चर्य वाटले. कारण डोंगर, दर्या, निसर्ग या त्यांच्या नेहमीच्या जगण्यातल्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपल्या शहरी लोकांसारखे अप्रुप नसते. या लोकांचे एकनाथकडे कौतुक केल्यावर तो बोलला काही नेटवर्कची रेंज इथेच मिळते त्यामुळे मोबाईलवर बोलायला गावातले लोक इथपर्यंत येतात.
पाण्याची दोन टाकी |
पठारावरुन गावची वाट धरली. वाटेत सुंदर जांभळ्या, गुलाबी रंगांच्या छोट्या फ़ुलांच्या गुच्छांनी लगडलेली झाडं दिसत होती. त्या फ़ुलांचा सडा खालच्या कातळावर पडून तोही जांभळा झाला होता. गावकरी या झाडाला करप या नावाने ओळखतात. हे अंजनाचे (Memecylon umbellatum) झाडं होते. त्याची सुंदर फ़ुलं बघुन गोविंदाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवल्या.
अंजन |
ऱाकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा !!
अंजनाच्या कळ्या |
Memecylon umbellatum |
एक उंचवटा चढून झाडीतून बाहेर आलो. गावातल्या घरांच्या पार्श्वभूमीवर समोर अलंग - मदन - कुलंगचे दुर्ग त्रिकुट उठून दिसत होते.
अलंग - मदन - कुलंग |
एकनाथच्या सारवलेल्या अंगणात "सॅका" टाकून थेट जेवायला बसलो . भाकरी पिठले , चटणी , कांदा अशा गावरान मेन्यूवर यथेच्छ आडवा हात मारुन अंगणात आडवे झालो . अशा वेळी निघणाऱ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी , पुढच्या अनेक ट्रेकचे हवेतल प्लानिंग त्यावर चर्चा झाली . भर दुपारी डांबरी सडकेवर येउन कोकणकड्याच्या दिशेने वाटचाल चालू केली .
झरा |
उंबरदरा |
बिकट वाट |
छिद्राचे तोंड |
दुसरी बाजू |
या थरारक अनुभवा नंतर पुन्हा दगडांची वाट उतरायला सुरुवात केली . एके ठिकाणी ओढ्याने उंचावरून उडी मारली होती . त्यामुळे पुन्हा पुढची वाट बंद झाली होती . मग ओढ्याच्या बाजूने जंगलातून जाणाऱ्या घसार्याच्या वाटेने उतरायला सुरुवात केली . काही वेळाने पुन्हा ओढ्यात उतरुन दगडगोट्यातून चालायला सुरुवात केली . उतरायला सुरुवात केल्यापासून साधारणपणे दिड तासाने ओढ्याची वाट सोडून उजव्या बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली . उंबरदरा पासून येणारा हा ओढा पुढे चोंढ्या धरणाच्या जलाशयाला जाऊन मिळतो.
चोंढे धरण |
डोंगरावर जाणारी पायवाट पकडून १० मिनिटात स्वीच यार्ड पाशी पोहोचलो . येथे डोंगरात इरीगेशन डिपार्टमेंटने एक मोठा बोगदा खोदलेला आहे . हा बोगदा ग्रील लावून बंद केलेला असतो . तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परवानगी दिली तरच बोगद्यातून जाता येते . अन्यथा बोगदा असलेला डोंगर चढून रस्त्यावर उतरावे लागते . बोगद्याच्या पुढे डांबरी रस्त्याने १५ मिनिटे चालल्यावर आम्ही ट्रेक चालू केला त्या ठिकाणी M पॉईंटवर पोहोचलो . उंबरदरा उतरायला आम्हाला दोन तास लागले होते . एकनाथचा निरोप घेतला तो चोंढ्या घाटाने घाटघरला निघाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .
चोंढ्या घाट - उंबरदरा हा ट्रेक एक दिवसाचा ट्रेक आहे . चोंढ्या घाट ट्रेक वर्षभरात केंव्हाही करता येइल . उंबरदरा मात्र पाणी ओसरल्यावर डिसेंबर नंतर मे महिन्यापर्यंत करता येइल . उंबरदरा उतरण्यासाठी गाईडची आवश्यकता आहे .
चोंढ्या धरण - चोंढ्या घाट - घाटघर :- १ ते १.५ तास
घाटघर - उंबरदरा पॉइंट :- अर्धा तास
उंबरदरा पॉइंट - उबंरदरा घाट - चोंढ्या धरण :- २ ते २.५ तास
GPS ने रेकॉर्ड केलेली चोंढ्या घाट - घाटघर- उंबरदरा भटकंती, नकाशा :- महेंद्र गोवेकर |
शिपनुर |
Photos by :- kaustubh & Amit Samant © Copy right
Video by :- Pallavi
Map :- Mahendra Govekar © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900
रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्यातील भटकंती हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.
नेहमी प्रमाणे मस्त सहज सोपे लिखाण. ��������
ReplyDeleteछान लेख आहे. साधी सोपी सरळ भाषा..
ReplyDeleteऑफबीट पण मस्त अनुभव तसंच वर्णनही..👌
ReplyDeleteछान..👍
लेख वाचताना स्वतः अनुभव घेतोय असं वाटल. छान, पण खडकातून केलेला प्रवास रोमहर्षक.👍👍
ReplyDeleteथरारक मार्ग आणि अप्रतिम वर्णन 👌🏻👌🏻
ReplyDeleteओघवते लिखाण ,वाचताना स्वतः प्रवास केल्याची अनुभूती येते
ReplyDeleteखूप छान लेखन
ReplyDeleteअवघड वाट
सुंदर
ReplyDeleteभारीच रे दादा, फेसबुक वर फोटो पहिल्यापासूनच या लेखाची वाट पाहत होतो!!! एकनाथला गाठायला पाहिजे आता!!!
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख. ट्रेकिंग केल्याचा आनंद मिळाला. ��
ReplyDeleteखूपच सुंदर लेखणी आणि खूपच अवघड वाट......
ReplyDeleteVery exciting and daring trek. Good work.
ReplyDeleteनेहमीप्रमाणे उत्तम ब्लॉग 👌👍
ReplyDeleteअतिशय छान. फोटो ही।. जणू तिथे पोहचलो.
ReplyDeleteभटकंती स्वतः केल्याचा अनुभव आला पण मुळात ही अवघड वाट बघून ही भटकंती मुरलेला भटक्याच करू शकतो
ReplyDeleteवाचून याचा प्रत्यय आला
उंबरदरा येथील छिद्रातून वाट काढणे म्हणजे खरंच खतरनाक अनुभव. Hats off to u guys.
ReplyDeleteMasta bhatkanti
ReplyDeleteखूप छान वाटले वाचुन.वाचताना डोळया सम
ReplyDeleteखूप छान वाटले वाचुन.वाचताना डोळ्यासमोर भटकंती चे चित्र अनुभवले.
नमस्कार अमित सर, चौंढ्या घाट करायचा विचार बरेच दिवस घोळत आहे मनात. मला घाटघरच्या एकनाथ दादा चा नंबर मिळू शकेल का ? मी तुम्हाला ई-मेलही केला आहे. तिथे नंबर पाठवला तर बरं होईल.
ReplyDelete