Shoes on the Danube |
जगात कुठेही गेले तरी तिथल्या अनाम वीरांची , हुतात्म्यांची , स्वातंत्र्य सैनिकांची भव्यदिव्य स्मारके आढळतात . या स्मारकांपासून पुढच्या पिढ्यानी प्रेरणा घ्यावी आणि प्रसंगी देशासाठी राजासाठी बलिदान द्यावे यासाठी अगदी पूरातन काळापासून अशी स्मारके उभारली जाताहेत .
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये मात्र एक वेगळ्या प्रकारचे स्मारक पाहायला मिळाले . बुडापेस्ट शहराच्या मधून डॅन्यूब नदी वाहाते . या नदीने या शहराचे दोन भाग केलेले आहेत . नदीच्या एका किनाऱ्यावर बुडा वसलेले आहे तर दुसऱ्या किनाऱ्यावर पेस्ट वसलेले आहे . डॅन्यूब नदी ही युरोपातील महत्वाची नदी . जर्मनीत उगम पावून २८५० किलोमीटरचा प्रवास करुन ही नदी काळ्या समुद्राला जाऊन मिळते . आजपर्यंत अनेक संस्कृती या नदीच्या काठी नांदलेल्या आहेत त्यातलीच एक आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेली रोमन संस्कृतीही या नदीच्या काठाने फोफावली . आजच्या घडीला व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) , ब्राटीस्लावा (स्लोव्हाकिया) , बुडापेस्ट (हंगेरी) , बेलग्रेड (सर्बिया) या ४ देशांच्या राजधान्या या नदीच्या काठी वसलेल्या आहेत .
Danube River from Buda Castle, Hungary |
बुडापेस्ट मध्ये डॅन्यूबच्या किनाऱ्यावर हंगेरियन पार्लमेंटची गॉथिक शैलीतील भव्य इमारत उभी आहे. या इमारतीपासून ५ मिनिटाच्या अंतरावर हे आगळेवेगळे स्मारक आहे . या ठिकाणी ३० बुटांच्या जोड्या नदीच्या काठावर ठेवलेल्या आहेत . ब्रॉंझ मध्ये बनवलेले हे स्त्री, पुरुषांचे , मुलांचे बूट वेगवेगळ्या मापाचे , डिझाईनचे आहेत. या बूटांच्या जोड्यांच्या मागे काळा इतिहास आहे.
दुसऱ्या महायुध्दाच्या शेवटच्या काळात (१५ ऑक्टोबर १९४४ ते २८ मार्च १९४५ ) हंगेरीत ॲरो क्रॉस पार्टीची सत्ता होती .Ferenc Szálasi हा त्यांचा नेता होता . या पार्टीची विचारसरणी नाझींशी जुळणारी होती . नाझींच्या सहकार्याने त्यांनी हंगेरीत हाहाकार उडवून दिला . त्याकाळी लाखाच्यावर ज्यू हंगेरीत राहात होते . केवळ ५ महिन्यातच त्यापैकी ८०००० ज्यूंना ॲरो क्रॉस पार्टीने कॉंस्ट्रेशन कॅंप मध्ये पाठवून दिले, तर १०००० च्यावर लोकांची बुडापेस्ट मध्येच हत्या करण्यात आली .
याच काळात ज्यू स्त्री, पुरुष, मुलांना पकडून आणून डेन्यूबच्या काठावर त्यांना उभे केले जात असे . युध्दकाळात चामड्याचे बूट ही मौल्यवान वस्तू होती . त्यामुळे या पकडून आणलेल्या लोकांना बूट काढून डेन्यूबच्या काठावर नदीकडे तोंड करुन उभे केले जाई आणि त्यांना गोळ्या घातल्या जात . त्यांची कलेवर डेन्यूबच्या थंड पाण्याबरोबर वहात जात . मिळालेले बूट ते अधिकारी , सैनिक स्वतःसाठी ठेवत किंवा विकून टाकत .
ॲरो क्रॉस पार्टीच्या काळात झालेल्या या ज्यूंच्या शिरकाणाचे स्मारक म्हणून “Shoes on the Danube” हे स्मारक १६ एप्रिल २००५ रोजी उभारण्यात आले . या स्मारकाची कल्पना चित्रपट दिग्दर्शक Can Togay यांनी मांडली आणि शिल्पकार Gyula Pauer यांनी हे बुटांचे आगळेवेगळे शिल्प साकारले .
या स्मारकाला भेट देणारे पर्यटक या बूटांमध्ये फूले खोचून ठेवतात , काही जण रात्री या ठिकाणी मेणबत्त्या लावतात . या बळी गेलेल्या कोणाशीही रक्ताचे नाते नसतानाही केवळ माणूसकीच्या नात्याने आज हे सहज घडताना दिसत होते . काही वर्षापूर्वी याच माणूसकीचा दुसरा क्रूर चेहरा पाहीलेली डेन्यूब मात्र संथपणे पोटात थंड पाणी घेउन वहातेच आहे.....
Shoes on the Danube |
एक वेगळाच ब्लाँग लिहिला आहेस. अनोखी माहिती.. छान आहे.
ReplyDeleteसुरेख माहिती
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteMast mahiti.thanks for sharing.
ReplyDeleteछान माहिती मिळाली! नाविन्यपूर्ण असल्याने ज्ञानात भर!👌
ReplyDeleteया अनाम वीरांचा इतिहास या लेखामुळे समजला
ReplyDeleteArey maste. Shot and crisp.
ReplyDeleteसुरेख, लेख वाचून Escape from Sobibor हा चित्रपट आठवला.
ReplyDelete👌 Chan mahiti dili
ReplyDeleteमाहिती बद्दल धन्यवाद🙏
ReplyDeleteGood to know the history. Thanks Amit
ReplyDeleteतुमच्या मुळे जगरहाटी कळतेय
ReplyDeleteअमित मस्त नवीन माहिती मिळाली स्मारकांच्या यादीत अजून एक नाव.
ReplyDeleteसुंदर माहिती, अभ्यासपूर्ण लेखन.
ReplyDeleteNice pics n info
ReplyDeleteछान
ReplyDelete-भुषण
खूपच छान लेखणी......
ReplyDeleteThe shoes on the Danube memorial info was new for me I had not read a about it before.
ReplyDeleteExcellent blog, keep on sending such info.
👍👏✍👌
ReplyDeleteओघवते वर्णन
ReplyDeleteछान माहिती आणि वर्णन
ReplyDeleteअभ्यासपूर्ण निपीक्षणात्मक, परिपूर्ण लेख
ReplyDeleteकाळ्या इतिहासाची पण छान माहिती..👌
ReplyDeleteखूप छान माहिती दिली 👍
ReplyDelete~ मिलिंद जाधव
Deleteजेम्स क्यामरॉन चा "शिंडलर्स लिस्ट" मूव्ही आठवतो.जर्मनीने ज्यू वर केलेले अत्याचार आठवतात. Thank for reminding with the blog..
Deleteछान , now it is in my bucket list
ReplyDelete
ReplyDeleteखूप छान माहिती..
मस्त माहिती! या स्मारकाविषयी माहित नव्हतं काहीच.
ReplyDeleteआगळीवेगळी.... छान
ReplyDeleteवेगळी महिती, धन्यवाद
ReplyDelete