२० नोव्हेंबर २०१० ला आमच्या "ट्रेक क्षितिज" संस्थेचा कोठिम्ब्याच्या वनवासी कल्याण आश्रमात स्लाइड शो होता . मी आणि श्रीकृष्णने पाठ पिशवीत प्रोजेक्टर , camera, पाण्याची बाटली भरून कर्जत लोकल पकडली . नेरळला उतरून टमटमचा १२ कि.मी .चा खडतर प्रवास करुन कशेले गावात पोहोचलो . तिथें दूसरी टमटम पकडून कोठीम्बा गावाच्या पुढील फाट्यावर उतरालो . त्यानंतर अर्धा कि.मी. चालल्यावर आम्ही एकदाचे वनवासी कल्याण आश्रमात पोहोचलो .
आश्रमाच्या रुचकर व सात्विक जेवणाचा आस्वाद घेउन आम्ही आश्रमा मागील जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेलो . तेथे अनेक प्रकारची फुलपाखरे व फुले होती त्यांची छायाचित्रे घेतली . थोड्या अंतरावर एका ओढ्यावर आश्रमाने बांध घालून छोटेसे धरण केले होते , त्यावरुन पडणारया पाण्याचा नाद ऐकत आम्ही बराच वेळ बसलो. जर स्लाइड शो करायचा नसता तर आम्ही फुलपाखरा सोबत तिथेच बसलो असतो .
बरोबर २.३० वाजता सह्याद्रितील किल्ले या स्लाइड शो ला आम्ही सुरुवात केली. मुले व कार्यकर्त्यां बरोबर संवाद साधत केलेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला . कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांबरोबर पावसानेही आम्हाला दाद दिली . नंतर धो - धो पाउस तासभर पडला .पाउस कमी झाल्यावर आश्रमाताल्या कार्यकर्त्यांनी कशेले गावापर्यंत आम्हाला सोडले. पडणारया पावसाने वातवरणात सुखद बदल घडवून आणला होता .त्यामुले सकाळी रखरखीत आणि कंटाळवाणा वाटणारा प्रवास आता सुंदर वाटत होता . कदाचित "ट्रेक क्षितिज" संस्थेने अजुन एक छान स्लाइड शो केल्याचा हा परिणाम असावा .
hats off
ReplyDeletedada
Wow.................
ReplyDeleteSahi Amit avadla...
ReplyDeleteअमित
ReplyDeleteखरंच खूप छान काम केलंस
ट्रेक क्षितीज चे सुद्धा अभिनंदन
कळत नकळत हे किल्ले आपल्याला जोश देतात
मनात आपल्या इतिहासाचा अभिमान जागवतात
आणि आदिवासी आश्रमातील मुलांना हा आनंद तुम्ही देत आहात
अमितचे आणि तुमच्या सगळ्यांचेच पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन
रूपक
मस्त वाटतंय वाचायला!!
ReplyDeleteलहानपणची आठवण झाली. सविस्तर माहीती छान वाटली.
ReplyDelete