कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेनंतर ट्रेकिंगला सुरुवात करायची होती. अनेक महिने ट्रेक न केल्यामुळे सगळ्यांची कॉन्फिडन्स लेव्हल एकदम "हाय" होती. ट्रेकसाठी विचारल्यावर लोकांनी जी कारण सांगितली त्यावर "ट्रेकला न येण्याची १०१ कारणे" हे पुस्तकं लिहिता येईल. त्यामुळे जे उरले होते, त्यांच्याशी चर्चा करून त्यातल्या त्यात सोपा ट्रेक ठरवला. रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत.
माथेरानला जाण्यासाठी अनेक
वाटा आहेत. त्यातल्या कर्जत बाजूकडून येणाऱ्या वाटांपैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट
आणि बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट या वाटा गावाकऱ्यांच्या रोजच्या वापरातल्या
असल्याने मळलेल्या आहेत. या गावातील लोकांची रोजंदारीसाठी रोज माथेरनला जा - ये चालू
असते. यापैकी खाटवणं ते अलेक्झांडर पॉईंट ही वाट शेवटच्या टप्प्यात तीव्र चढाईची आहे,
तर बुरुजवाडी / दांडवाडी ते रामाबाग पॉईंट ही वाट मध्यम चढाईची आणि फ़िरत फ़िरत जाणारी
आहे. त्यामुळे भर पावसात रामबाग पॉईंट, माथेरान ते पोखरवाडी, कर्जत ही वाट उतरायची असे
ठरवून आम्ही सकाळीच माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर पोहोचलो.
दस्तुरीपासून रामबाग पॉईंट
४ किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानचा माथा पावसाळ्यात ढगात गुरफ़टलेला असतो. धुक्यात गुरफ़टलेल्या
जंगलातील वाटेने पावसाळी कुंद वातावरणात लाल मातीची वाट तुडवत बाजारपेठ गाठली. नाश्त्यासाठी
एकच केतकर हॉटेल उघडलेले होते. पर्यटकां ऐवजी स्थानिक लोकांचीच हॉटेलात वर्दळ होती.
अशा ठिकाणी नेहमीच चांगले चविष्ट पदार्थ मिळतात. भरपेट नाश्ता करुन अलेक्झांडर पॉईंटकडे निघालो. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण शोधणार्या
मॅलेटच्या जावयाचे (भाचीच्या नवर्याचे) नाव या पॉईंटला दिलेले आहे. मुख्य रस्ता सोडून
आतल्या रस्त्यावर आल्यावर झाडांची दाटी अधिकच वाढली. सततच्या पावसामुळे झाडावर आलेले
शेवाळं (मॉस) आणि बांडगुळ त्यांच्या रंगामुळे उठून दिसत होती. रस्त्याच्या कडेला असलेली
वारुळं पावसात "पॅक बंद" केलेली दिसत होती. पॉईंट जवळ आल्यावर धुक्यातून
एक कुटुंब समोर आले. त्यांच्या वेषावरुन ते खालच्या गावातून आलेले वाटत होते. थांबून
त्यांच्याशी गप्पा मारल्या, ते सर्वजण खाटवण गावात राहातात आणि हॉटेलात काम करण्यासाठी रोज
माथेरानला डोंगर चढून येतात. आम्ही रामबागेतून उतरणार आहे असे सांगितल्यावर त्यांच्यातल्या
एकाने आम्हाला, "खाटवण पर्यंत वाट दाखवतो तुम्हाला जसे वाटतील तेवढे पैसे द्या
असे सांगितले". पण आम्हाला त्या वाटेने उतरायचे नसल्याने आम्ही रामबाग पॉईंटकडे
निघालो.
माथेरानच्या बहुतेक पॉइंटसना
तो शोधणार्या साहेबांची, त्याच्या नातेवाईकांची किंवा खाली असणार्या गावांची नाव
दिली आहेत. अलेक्झांडर पॉईंट पासून माथेरानच्या दक्षिण टोकावर असलेल्या चौक पॉईंट पर्यंत
असलेल्या कड्या खाली सुंदर जंगल आहे. हे जंगल रामबाग किंवा रामाची बाग या स्थानिक नावाने
ओळखले जाते. त्यावरुन या पॉइंट "रामबाग" हे नाव मिळाले. गॅझेटीअर मध्ये या
पॉइंट्चा उल्लेख नाही. त्यामुळे हा नंतरच्या काळातला असावा. रामबाग पॉइंटच्या रेलिंगपाशी
पोहोचलो . अजूनही आम्ही ढगात असल्याने आजूबाजूचा परिसर दिसणे शक्यच नव्हते. रेलिंगच्या
उजवीकडून एक फ़रसबंदी वाट खालच्या जंगलात उतरत होती. त्या वाटेवरुन डोक्यावर हिरव्या
गवताचा भारा घेउन दोघे जण चढून येत होते. आम्हाला बघून ते थांबले. बुरुजवाडीतून चारा
घेउन ते माथेरानच्या घोडेवाल्यांना विकायला चालले होते. त्यांना वाट विचारुन घेतली.
वाट ठळक आणि मळलेली आहे कुठेही चुकायची शक्यता नाही असे सांगून त्यांने आम्हाला वाटेला
लावले.
फ़रसबंदी वाट |
उजव्या हाताला माथेरानच्या
डोंगराचा कातळकडा आणि डाव्या हाताला दरी अशी ती वाट उतरत होती. वाटेवर दोन छोटे धबधबे
लागले, पण पाऊस नसल्याने पाणी कातळाला चिकटून वहात होते. वाट वरच्या कड्याला समांतर
पुढे जात होती. या वाटेने अंदाजे पंधरा मिनिटे उतरल्यावर लिटील चौक पॉइंटच्या खाली
आलो. आता वाट कड्यापासून डावीकडे वळून दाट जंगलात शिरली. उंच वृक्षांच्या दाटीतून वळणा
वळणाने जाणार्या वाटेवर छोटे छोटे ओढे लागत होते. आता आम्ही ढगांच्या बाहेर आलो असलो
तरी झाडांचे माथे अजूनही ढगात होते. त्यातून झिरपणार्या हिरव्या ओल्या प्रकाशामुळे
वातावरण गुढ झाले होते. या वातावरणाने भारल्या सारखे सर्वजण निशब्दपणे उतरत होतो.
वृक्षांच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत झुडपं वाढली होती. त्यावर सुंदर फ़ुलं उमलली होती.
सुर्यप्रकाश अजून जंगलात न शिरल्यामुळे फ़ुलपाखरं मात्र दिसत नव्हती. अशा गुढरम्य वातावरणातून
अर्धातास चालून जंगलाच्या बाहेर आल्यावर समोर एक छोट पठार पसरलेल होते. पठारावरुन समोर
सोंडाई किल्ल्याचा डोंगर, डावीकडे माथेरानच्या गारबेट
पॉईंटचा डोंगर दिसत होता. मागे वळून पाहिल्यावर आम्ही चालून आलो ते जंगल पठाराच्या
सीमेवर उभे होते आणि त्यामागे माथेरानचा माथा ढगात लपलेला दिसत होता.
चौकी पॉईंट वरुन मोरबे धरण |
कारवीतून वाट |
सुरेख वर्णन. असे वाटते की आपण खरंच त्या ट्रेक मध्ये आपल्या बरोबर आहोत. फोटो पण निवडक आहेत. घरबसल्या आमचा पण प्रवास झाला.
ReplyDeleteचांगले प्रवास वर्णन,फोटो पण खूप छान आहेत
ReplyDeleteमस्तच सुरवात झाली.माथेरान आणि एकूणच पावसाळी निसर्ग अप्रितम.
ReplyDeleteआता नवीन मोहिमा फत्ते करायला घ्या
Sunder
ReplyDeleteअत्यंत सुंदर शब्दांकन.
ReplyDeleteएक एकदम नवीन ट्रेक सुचवल्याबद्धल धन्यवाद
ReplyDeleteमस्त, पावसाळी निसर्ग एकदम योग्य शब्दात पकडलाय. तुमच्याबरोबर मलाही ट्रेक करायची खूप इच्छा आहे. बघू कधी जमतं..तुमचा लेख वाचून आमच्या सोंदाईच्या आठवणी जाग्या झाल्या. तुमचं लेखन नेहमी नवीन ठिकाणांच आणि मार्गदर्शक असतं..👌
ReplyDeleteसुंदर वर्णन
ReplyDeleteस्वतः जरी ट्रेक करू शकलो नाही तरी या वर्णनातून प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा भास झाला
घरबसल्या प्रत्यक्ष फिरून आल्याची अनुभुती देणारं लिखाण!ऑफिसच्या कामाच्या रहाटगाडग्यात हा ब्लाॅग वाचून मन छान थंड पावसाच्या पाण्याचा छिडकावा झाल्यासारखे प्रसन्न झाले!
ReplyDeleteInformative ,
ReplyDeleteअमित खूपच छान.. ओघवती भाषा, सुंदर वर्णन. एव्हढ्या सकाळी माथेरानला कसे पोहोचला ते पण सांग..
ReplyDeleteAmazing , I like the way you presented
ReplyDeleteसुंदर वर्णन , नविन ट्रेक आहे!
ReplyDeleteअतिशय अप्रतिम प्रवास वर्णन, लेख वाचून ट्रेक झाल्यासारखा वाटले
ReplyDeleteसुंदर वर्णन
ReplyDeleteसुंदर ओघवती भाषा व त्यात निवडक छान समर्पक फोटो , लिकानातूनच ट्रेक अनुभवायला मिळाला ,
ReplyDeleteशुभेच्छा
सुंदर माहिती आणि कोळ्याचे जाळे मस्त छायाचित्र. माथेरान आहेच प्रेक्षणीय..
ReplyDeleteअमित मस्त मुशाफिरी, ट्रेक करायला आवडेल
ReplyDeleteसुंदर वर्णन....
ReplyDeleteमाथेरानच्या वाटा हा माझा जिव्हाळ्याचा विषय.माथेरानच्या नळी वाटाही तितक्याच जबरदस्त आहेत.
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteAmazing Photos and information..
ReplyDelete