Pages

Wednesday, August 6, 2014

Undiscovered Sindhudurg Fort अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग

अपरिचित किल्ले सिंधुदुर्ग


Sindhudurg Fort Malvan

मालवण माझ गाव असल्याने सिंधुदुर्ग किल्ला हा माझा मातृकिल्ला (मातृभुमी सारख) आहे. सिंधुदुर्गावर आत्ता पर्यंत ३० फ़ेर्‍या झाल्यामुळे मला सर्व किल्ला माहिती आहे, अस मला उगाचच वाटायला लागल होत. माझ्या बरोबर किल्ल्यावर येणार्‍यां मित्रांना, नातेवाईकांना मी एखाद्या इतिहास तज्ञाच्या आवेशात मोरयाच्या धोंड्यापासून ते राणीच्या वेळा पर्यंत किल्ल्याची माहिती सांगायचो. त्यावेळी शिवराजेश्वर मंदिरातले महाराज आणि सिंधुदर्ग किल्ला माझ्याकडे बघून नक्कीच हसत असणार.

Scuba Diving behind Sindhudurg Fort, Malavan

      त्याच झाल अस की, मालवणला इतक्या वेळाजाऊनही मी स्कुबा डायव्हींग केल नव्हत. २०१३ साली स्कुबा डायव्हींगसाठी बोटीने किल्ल्याच्या मागच्या बाजुला गेलो आणि समोरच दृश्य पाहून हरखुन गेलो. सिंधुदुर्गाच्या तटबंदीत चक्क एक चोर दरवाजा दिसत होता. समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या थोडासा वर असलेला चोर दरवाजा, यातून निसटायच म्हणजे एकतर होडी पाहिजे किंवा समुद्राच्या पाण्यात झोकून द्यायच आणि पोहत मालवणचा किनारा गाठायचा.

एवढ्या वेळा किल्ल्याला भेट देऊनही हा चोर दरवाजा मला किल्ल्याच्या आतून दिसला नव्हता. कारण किल्ल्यात पाणी येऊ नये म्हणुन तो आतून बंद करण्यात आला आहे. तरीही आजही तिथुन समुद्राच पाणी किल्ल्यात येत. (समुद्राच पाणी चोर दरवाजातून किल्ल्यात येऊ नये म्हणुन ३०० वर्षापूर्वी काय योजना केली होती हा अभ्यासाचा विषय आहे).

चोर दरवाजा , सिधुदुर्ग किल्ला
         चोर दरवाजा पाहिल्या पासून मी अस्वस्थ झालो, इतक्या वेळा किल्ला पहिला पण अजून बरच काही बघायच राहीलय अस जाणवायला लागल. मग माझा शोध सुरु झाला किल्लाचा कोपरा न कोपरा माहित असलेल्या माणसाला शोधण्याचा.माझ्या सुदैवाने माझी भेट झाली गेली १२ वर्ष सिंधुदुर्ग किल्ल्याचे  संरक्षक असलेल्या पुरातत्व खात्यातल्या श्री हरीश गुजराथींशी

Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan



Shivrajeshwar Mandir, Sindhudurg Fort, Malvan

Sindhudurg Fort
      किल्ला समग्र पाहाण्यासाठी हनुमान जयंतींचा मुहुर्त निवडला होता. दरवर्षी मालवणची सिंधुदुर्ग सेवा समिती किल्ल्यावर जाउन हनुमान जयंती साजरी करते. त्यामुळे सकाळी ७.०० वाजताच किल्ल्यावर मी, कौस्तुभ आणि गुजराथी दाखल झालो. गुजराथींनी रुईच्या फ़ुलांचा स्वत: बनवलेला लांबलचक हार प्रवेशव्दारा जवळच्या हनुमंताला घातला. नारळ फ़ुटले गाराण घातल आणि सर्वजण शिवराजेश्वर मंदिरात पोहोचले. त्या मंदिरातही पूजा आणि गाराण झाल. महाराजांचा जयजयकार झाला. कोल्हापूरहून आलेल्या मुलांनी तलवारबाजीची उत्कृष्ठ प्रात्येक्षिक दाखवली.

     सकाळी ८.०० वाजता आम्ही गडफ़ेरीला सुरुवात केली. त्यात चुन्याचा घाणा, चुना साठवण्याचे हौद, तटबंदीतली खोली, बुरुजावर कोरलेला गणपती अशा बर्‍याच नविन गोष्टी पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पडझड झालेल्या बुरुजांचे व तटबंदीचे बांधकाम चालू होत. समुद्रात पडलेले दगड क्रेनच्या मदतीने बाहेर काढून रचण्याच काम चालू होत. आज इतक्या सोयी सुविधा असुनही खाली पडलेला दगड उचलून वर आणून बुरुजात योग्य जागी बसवण प्रचंड कठीण काम होत. तर ३४० वर्षापूर्वी हा किल्ला बांधताना समुद्राच्या पाण्याशी झुंज देत पायापासून  दगड कसे बसवले असतील हा विचार मनात आला. 

बुरुजातली खोली

चुना साठवण्याचा हौद

चुन्याचा घाणा

Ganpati on Buruj of Sindhudurg Fort
सकाळी ८.०० ला सुरु झालेली किल्ल्याची भटकंती दुपारी १.०० ला संपली. एप्रिलच उन आणि खारी हवा यांनी हैराण झालो होतो, पण किल्ला पूर्ण पाहिल्याचे समाधान काही औरच होते. एक स्वप्न तर पूर झाल . आता एकदा सिंधुदुर्ग किल्ला छोट्या होडीतून सर्व बाजूंनी फ़िरुन पाहायचाय. न जाणो अजून काही नविन हाती लागायच.


Bastion at Sindhudurg Fort before repairing
Bastion at Sindhudurg Fort after repairing
Shri Gujrathi & Me


7 comments:

  1. Khup chan ani navin mahiti milali

    ReplyDelete
  2. लेख आवडला..सिंधुदुर्ग किल्ला मी 2004 साली पाहिला होता. .सोबत स्थानिक वाटाड्या होता, ज्याने किल्ल्याची फारच तुरळक माहिती दिली ..तरीही सवयी नुसार शक्य तेवढे फिरुन मी किल्ल्याचे स्थापत्य-बांधणी समजून घ्यायचा प्रयत्न केला. हा लेख वाचला आणि ..चोर दरवाजा. .या निमित्ताने वाढिव माहिती मिळाली, त्या बद्दल आभार..पुढच्या सिंधुदुर्ग भेटीत किल्ल्याचा हा भाग सुद्धा माझ्या किंवा कोणा पर्यटकाच्या नजरेतुन सुटणार नाही हे निश्चित..!!!

    ReplyDelete
  3. संतोष कदमApril 22, 2016 at 4:48 AM

    फारच सुंदर! एखादे दृश्य पहाताना चित्रकाराची नजर किंवा कवीचे मन असेल तर ते काही जास्तच बारकाव्यांसहित दिसते व कळतेही. सामान्यतः इतक्या बारकाईने आम्ही कधी पहातच नाही. विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. sir ha burujatla ganpati mala ekada eka sthanikane dakhavala hota mala nakki athavat nahi pan tumhi sangal ka nakki kontya burujavar ahe

    ReplyDelete